Wednesday, 15 October 2025

वाचन प्रेरणा दिन १५ ऑक्टोबर २०२५ - "घेवू या एकच वसा मराठीला बनवु या ज्ञानभाषा"

 वाचन  प्रेरणा दिन १५ ऑक्टोंबर २०२५

“वाचन प्रेरणा दिननिमित्त” अस्मिता कला वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या ग्रंथालयात दिनांक १५ ऑक्टोबर २०२५ रोजी माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी यावर्षी मराठी भाषा ही ज्ञान भाषा या संकल्पनेला अनुसरून,घेवू या एकच वसा मराठीला बनवु या ज्ञानभाषा”, असे धोरण विचारात घेऊन मराठी भाषेची आणि मराठी साहित्याची गोडी निर्माण करण्यासाठी मराठीच्या सहाय्यक प्राध्यापिका अंजना ढेरे यांनी मराठी साहित्याची ओळख केली. त्यानंतर ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी ग्रंथालयातील मराठी भाषेतील वाचन साहित्य उपलब्ध करून दिले. हे वाचन साहित्य वाचण्यासाठी विद्यार्थीनींनी  उस्फुर्त प्रतिसाद दिला.











No comments:

Post a Comment