Om Vidyalankar Shikshan
Sanstha’s
Asmita College of Arts &
Commerce
For Women
·
Affiliated to Mumbai University ·
=============* ASMITA
COLLEGE CHOWK, KANNAMWAR NAGAR NO.2, VIKHROLI (EAST), MUMBAI- 400 083 * ===============
मराठी
भाषा दिन
अस्मिता कला व
वाणिज्य महिला महाविद्यालात मंगळवारी दिनांक २७/०२/२०१८ रोजी मराठी साहित्याचे
सम्राट वि. वा. शिरवाडकर म्हणजेच "कुसुमाग्रज" यांच्या वाढदिवसानिमित्त
विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्त संकल्प
असोसिअशन तर्फे 'मराठी भाषीय विद्यार्थिनींनसाठी नोकरीच्या नवीन संधी' या विषयावर S.
Y. B. A. व T. Y. B. A. च्या विद्यार्थिनींसाठी परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादामार्फत मराठी भाषिक विद्यार्थिनींना व्यवसाय व नोकरी
साठी उपलब्ध असलेल्या विविध संधींविषयी माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम अतिशय माहितीपूर्ण
व परस्परसंवादी होता.
F. Y. B. A. च्या
विद्यार्थिनींसाठीसाठी 'कुसुमाग्रज यांचा जीवनपट व साहित्य' या विषयावर कार्यक्रम
आयोजित केला. F. Y. B. A. ची विद्यार्थिनी मनाली आपटे
हिने प्राचार्य डॉ. एच एस गोर्गे , उपप्राचार्य प्रोफ. मनीषा नायर व उपस्थित
शिक्षकगण व विद्यार्थांचे स्वागत करून कार्याक्रमची सुरेख सुरुवात केली. त्यानंतर
प्राचार्यांनी दीपप्रज्वलन करून मराठी भाषा दिनाचे महत्व आपल्या भाषणातून व्यक्त
केले. उपप्राचार्यांनी मराठी भाषा व भाषेचा रोजच्या जीवनातील वापराबाबत मार्गदर्शनपर
भाषण केले.
विद्यार्थिनी काजल
पेडणेकर, श्रद्धा गमरे, ऐश्वर्या जाधाव यांनी कुसुमाग्रजांबद्दल माहिती सांगितली.
तर नेत्रा महाकाळ हिने त्यांच्या प्रसिद्ध नाटकांचा थोडक्यात परिचय दिला. अश्विनी
नलावडे, दिपाली पाटील, सुजाता सकुडे, सुवर्णा पगारे, कांचनी जाधव, भाग्यश्री इंगळे, शिवानी थवी, प्रिया
केदारे, अश्विनी पोवार, ऋतुजा राक्षे, लक्ष्मि जाधव, विजिता शेडेकर यांनी
कुसुमाग्रजांच्या व इतर प्रसिद्ध कवी व कावियात्रींच्या कवितांचे सुरेख सादरीकरण
केले.
सदर मराठी राजभाषा
गौरव दिन F. Y. B. A. ला मराठी शिकविणIर्या प्राध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला गेला. या
कार्यक्रमाची सांगता तेजल मोरे या विद्यार्थिनीने केली व उपस्थित शिक्षकवर्ग आणि
विद्यार्थिनींनच्या सहकार्याबद्दल आभार मानले.
तसेच अस्मिता कला व
वाणिज्य महिला महाविद्यालयातील ग्रंथालयात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी
साहित्यावर ग्रंथ व भित्तीपत्रके मांडण्यात आली.
अशा विविध
कार्यक्रमांतून मराठी भाषेचा जागर व मराठी भाषेचा सन्मान राखण्याचा संदेश
विद्यार्थिनींनना देण्यात आला.
Click here for the video
No comments:
Post a Comment